🕒 1 min read
नवी दिल्ली : शिखर धवन (Shikhar Dhawan) साठी गेले काही महिने चांगले गेले नाहीत. मग ते करिअर असो की वैयक्तिक आयुष्याबाबत. यूएई आणि ओमानमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धवनची निवड झाली नव्हती आणि अलीकडेच त्याने पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला आहे. या कठीण काळातून टीम इंडियाचा ‘गब्बर’ स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, त्याने इंस्टाग्रामवर मुलगा जोरावरसोबत झालेल्या व्हिडिओ कॉल संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये धवन आणि त्याचा मुलगा एकाच हेअरस्टाईलमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करण्यासोबतच धवनने कॅप्शन लिहिले ‘जसे वडील तसा मुलगा, मला तुझी आठवण येत आहे.’
शिखर धवन त्याच्या मुलाच्या खूप जवळ आहे. दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आहे. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. धवनला प्रोत्साहन देण्यासाठी मुलगा जोरावर अनेकदा स्टेडियममध्ये दिसला आहे. शिखरने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आयशा मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांचा मुलगा जोरावरचा जन्म 2015 मध्ये झाला. मात्र, नुकतेच धवन आणि आयशाचे 9 वर्षे जुने नाते संपुष्टात आले आहे. यानंतर जोरावर आपल्या आईसोबत ऑस्ट्रेलियाला गेला आहे.

शिखर धवन विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळत आहे. मात्र, या स्पर्धेतही त्याची सुरुवात चांगली झाली नाही. झारखंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. 2 दिवसांपूर्वी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याला केवळ 12 धावा करता आल्या होत्या. 36 वर्षीय धवनला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले नाही. अलीकडेच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या 3 टी-20 मालिकेतही त्याला संधी देण्यात आली नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
