Share

‘एसटी संप चिघळवून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जवळपास महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू असून संप काळात शेकडोने कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असले तरी एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी मेस्मा कायदा लागू करता येईल का? या संदर्भात एक बैठक घेतली होती. तसेच बैठकीनंतर ते म्हणाले होते की,’मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो आणि एसटी अत्यावश्यक सेवेत येते.’ परब यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्याची धमकी देणाऱ्या अनिल परब यांचा निषेध असो असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी आपली भूमिका मंडळी आहे.

यासंदर्भात पडळकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’परिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्यासाठी मी आणि सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) एसटी कर्मचाऱ्यांची डोके भडकवत आहेत, असा वारंवार आरोप केला. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत आणि आता ते मुघलशाही पद्धतीनं मेस्मा कायदा लावण्याची धमकी देताय. त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ज्यापद्धतीने राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावरती दबाव आणण्यासाठी माझ्या मोठ्या भावाला बेकायदेशीररित्या सांगली,सातारा,सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस दिली. त्याच चालाकीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता. पण ज्यापद्धतीने मुंबईमध्ये मील कामगारांचा संप झाला आणि तो संप चिघळवला गेला आणि तसाच अनिर्णायक ठेऊन मील मालकांशी हातमिळवणी करत त्या जागा लाटल्या गेल्या. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवुन विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव अनिल परब आणि सरकारचा दिसतोय.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!