Share

गुणरत्न सदवर्तेंना अटकेपासून दिलासा, पुणे पोलिसांना कोर्टाचा आदेश!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना काही अंशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सुरुवातीला शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली होती. त्यानंतर पुणे, सातारा, बीड, कोल्हापूर, सोलापूर, अकोला इथपर्यंत ही मालिका येऊन पोहचली. सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र आता न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. गेली अनेक दिवस सदावर्ते यांची एका पोलीस कोठडीतून दुसऱ्या पोलीस कोठडीत रवानगी होत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अडचणी वाढत होत्या. अनेक दिवस त्यांना पोलीस कोठडीत राहावे लागत आहे. मात्र आज त्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन भड़कवल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यांनी काही दिवस मुंबईतल्या पोलीस कोठडीत काढले. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आणि त्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर सातारा येथे त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला होता.

मराठा आंदोलनावेळी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवस त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र तो पर्यंत आणखी अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. साताऱ्यात थोडी अडचण कमी होताच त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत होता. मात्र पुण्याच्या केसमध्ये आता त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!