🕒 1 min read
मुंबई: पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासाही मिळाला आहे.
दरम्यान २५ मार्चपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- १०० सामन्यांचा तर केलाच, परंतु अजूनही एक विक्रम ‘किंग कोहलीने’ आपल्या नावावर केला आहे
- IND vs SL : दुर्दैव..! ऐतिहासिक कसोटीत विराट अपयशी; शतक तर हुकलच सोबतच…
- एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही; अनिल परबांनी विधानसभेत मांडला अहवाल
- ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल म्हणाला, “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारकडून ‘धक्का नाही धोका’; पंकजा मुंडे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
