🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादच्या सभेप्रमाणेच पुण्यातल्या सभेलाही स्थानिक पोलिसांनी अटी घातल्या आहेत. अटींचं पालन न झाल्यास राज ठाकरेंवर कारवाईही होऊ शकते. कोणत्या आहेत या अटी? पहा
अटींचं पालन –
१) समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं टाळावीत.
२) सभेत रुढी, परंपरा, वंशावरून चिथावणी दिली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
३) सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी.
4) कार्यक्रमात शस्त्र, तलवारी बाळगू नयेत, कायदेशीर नियमांचं पालन व्हावं.
५) सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.
६) सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वयंशिस्त पाळावी.
७) सभेचे नियम लोकांना कळवण्याची जबाबदारी आयोजकांची असेल.
८) सभेत क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी झाल्यास आयोजक जबाबदार असतील.
9) कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करता येणार नाही.
१०) व्यासपीठावरील लोकांची संख्या निश्चित असावी, ती पोलिसांना कळवण्यात यावी.
११) स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
१२) कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका, वाहनांना अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
१३) सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांची व्यवस्था करावी.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
