🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू (Andre Russell) चांगल्या फॉर्मात आहे. रसेलने आयपीएलमध्ये आपल्या दमदार खेळीने चाहत्यांना आकर्षित केले आहे. कोलकाताने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रसेलच्या नेट सेशनची झलक शेअर केली आहे. सरावादरम्यान रसेलने काही जोरदार फटके खेळले. रसेलने इतक्या ताकदीने शॉट खेळला, की तिथे ठेवलेली एत खुर्चीही तुटली.
यंदाच्या आयपीएलमध्ये आंद्रे रसेल कोलकात्यासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याने ७ डावात २२७ धावा केल्या आहेत. रसेलने १८०.५ च्या स्ट्राईक रेटने आणि ४५.४०च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचा पुढील सामना गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. स्पर्धेतील ४१व्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यंदा केकेआरच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. आयपीएल २०२२च्या गुणतालिकेत कोलकाता संघ आठव्या स्थानावर आहे.
https://www.instagram.com/p/CcxwzbcFgyr/
केकेआरला मागील चार सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले असून संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करत आहे. दोन वर्ष आयपीएल विजेता असलेल्या या संघाने गेल्या मोसमातही अशीच सुरुवात केली होती, परंतु दुसऱ्या टप्यात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यंदाच्या मोसमात केकेआर आपल्या कामगिरीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
