Share

“राणा दाम्पत्याचे उद्दिष्ट आता…”, महेश तपासेंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मी अनुसूचित जातीची आहे म्हणून मला भेदभाव करणारी वागणूक देण्यात आली, प्यायला पाणी दिले नाही, वॉशरुम वापरु दिले नाही, असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केले होते. याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील लिहिले आहे. तद्पश्चात मुंबई पोलिसांनी पुरावा देत नवनीत राणा यांच्या आरोपांचा भांडाफोड केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी नेते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात महेश तपासे यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘मागासवर्गीय असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये पाणी सुद्धा दिले जात नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता. मात्र थोड्या वेळा पूर्वीच एका व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनच्या आवारात चहा पाण्याचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मागासवर्गीय असल्यामुळे पाणीही दिले जात नसल्याची तक्रार केली होती. ज्यामध्ये एका प्रकारे जातीयवादाचा आरोप करण्यात आला.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आलेल्या या व्हिडीओमुळे राणा दाम्पत्याचे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा एकमेव उद्दिष्ट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जातीच्या नावावर खोटी तक्रार करणाऱ्या खासदारावर केंद्र शासन किंवा लोकसभा सचिवालय कोणती कारवाई करणार याकडे आमचे लक्ष आहे’, असेही तपासे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!