Share

IPL 2022 : “आम्ही या स्पर्धेत सर्वोत्तम…”, मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर रोहित शर्मा झाला भावूक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विक्रमी पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएलच्या (IPL 2022) चालू हंगामात विजयाचे खातेही उघडलेले नाही. रविवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे मुंबईला मोसमातील सलग आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी इतका वाईट हंगाम कधीच ठरला नव्हता. सलग आठ सामने हरणारा तो इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड होते, मात्र येथेही विजयाची प्रतीक्षा संपू शकली नाही. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने ६ बाद १६८ धावा केल्या, त्यानंतर मुंबईचा संघ ८ गडी गमावून १३२ धावाच करू शकला.

कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला टॅग करत लिहिले, ”आम्ही या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे घडते. अनेक दिग्गज देखील या टप्प्यातून गेले आहेत, परंतु मला हा संघ आणि तेथील वातावरण आवडते. त्याच वेळी, मला आमच्या हितचिंतकांचे देखील कौतुक करायचे आहे ज्यांनी आतापर्यंत या संघावर विश्वास आणि अतूट निष्ठा दाखवली.” रोहितच्या या ट्वीटवर अनेक चाहत्यांनी, आम्ही मुंबई इंडियन्स संघासोबत खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले आहे.

लखनऊविरुद्धच्या पराभवाचे खापर रोहितने संघाच्या फलंदाजीवर फोडले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ”आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना कमी धावसंख्येवर रोखले. मात्र, आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही. आम्ही भागीदारी करायला हवी होती पण तसे झाले नाही. आम्ही खराब फटके खेळले. मधल्या षटकांमध्ये माझ्यासह सर्वजण बेजबाबदारपणे फटके खेळून बाद झालो.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!