Share

धक्कादायक! पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने आधी स्वारगेट नंतर कात्रज बस स्टॉपवर महिलेवर केला बलात्कार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.  सदरील महिला कामानिमित्त बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते रूम शोधत होते. यावेळी आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात महिलेवर बलात्कार केला.

या घटनेनंतर पुणे हादरले आहे. दरम्यान पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत स्वारगेटजवळ बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार सदरील दाम्पत्य वाशीम येथून आले होते. या घटनेनंतर चालकाने महिलेला बसमधून खाली उतरवून दिले. या महिलेने स्वारगेटमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपीला बंगळुरु हायवेवर जेरबंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!