Share

धनंजय मुंडेंनी डिवचलं, राज ठाकरेंचा ‘उपटसूंभ’ असा केला उल्लेख!

Published On: 

सोलापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मशिदीवरच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादाचे आरोप केले आहेत. शरद पवार यांनी राज्यात जातीपातीचं राजकारण केल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज यांच्यावर पलटवार ही झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत राज ठाकरेंचा उल्लेख बोलका बाहुला असा केला होता. तर आज सोलापुरात बोलताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख उपटसूंभ असा केला आहे. माढा तालुक्यातील येथे समता परिषद आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात मुंडे बोलत होते.

महापुरुषांना जातीत वाटून टाकलंय. केंद्राच्या विरोधात लाव रे ते व्हिडिओ म्हणणारे, आता त्यांच्यात बरेच बदल झाले आहेत. हनुमान चालीसा मंदिरासमोर लावा म्हणा, कुणाच्याही घरासमोर नको. उपटसूंभ्याला महत्व देऊ नका. कोप लागेल तुमच्या मागे हनुमानाचा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान छगन भुजबळ यांनीही यादरम्यान भाषण केले. ते म्हणाले, स्वातंत्रोत्तर काळात दलित जातींना आणि आदिवासी जमातींना शैक्षणिक, राजकीय आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केला शाहू महाराजांनी. या भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांनी आरक्षण दिले. आता मात्र आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आपल्याकडे संविधानाने दिलेले आरक्षण काढण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आरक्षण काढण्याच्या विचारात असलेल्यांच्या विरोधात आपण एक होऊन लढा दिला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!