Share

IPL 2022 GT vs RCB : बास्स, खूप झालं..! विराट कोहलीचं मुंबईत ‘कमबॅक’; गुजरातला १७१ धावांचं आव्हान!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज शनिवारी डबल हेडरचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (GT vs RCB) यांच्यात रंगत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील काही काळापासून वाईट फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीने अर्धशतक ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केली. बंगळुरूने गुजरातला १७१ धावांचे आव्हान दिले आहे. विराटसोबत रजत पाटीदारनेही अर्धशतक ठोकले. गुजरातकडून अनुभवी गोलंदाज प्रदीप सांगवाननेही २ बळी घेत आपले कमबॅक साजरे केले.

बंगळुरुचा डाव

कप्तान फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा डावाची सुरुवात केली. गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानने डु प्लेसिसला शून्यावर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहलीने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. रजत पाटीदारनेही त्याला उत्तम साथ दिली. १३व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तब्बल १४ डावानंतकर विराटने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले. विराटनंतर रजतनेही आपले २९ चेंडूत अर्धशतक साजरे केले. सांगवानने १५व्या षटकात रजतला झेलबाद करत ही भागीदारी मोडली. पाटीदार-कोहलीने ९९ धावांची भागीदारी केली. १७व्या षटकात मोहम्मद शमीने विराटला क्लीन बोल्ड करत डाव संपुष्टात आणला. विराटने ६ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. दिनेश कार्तिकला (२) राशिद खानने लवकर तंबूत पाठवले. ग्लेन मॅक्सवेलने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २० षटकात बंगळुरुला ६ बाद १७० धावा करता आल्या. सांगवानने ४ षटकात १९ धावांत २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

गुजरात टायटन्स – शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कप्तान), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!