Share

“राज ठाकरे वेगवेगळे सोंग घेऊन भूमिका बजावतात” – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बोचरी टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “राज ठाकरे दररोज वेगवेगळे सोंग घेत असतात, सोंग घेऊन वेगवेगळ्या भूमिका करणे हा राज ठाकरे यांचा खेळ आहे,” अशा शब्दात अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेच्या रक्तारक्तात हिंदुत्व आहे आणि हे आम्हाला दाखवण्याची गरज नाही, असेही अंबादास दानवे म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभेवरून शिवसेनेच्या पोटात दुखतंय, अशी टीका मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांसमोर केली होती. यावर उत्तर देतांना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की राज ठाकरे हे सोंगाड्या असून ते दरवेळेस नवीन सोंग घेत असतात आणि त्यांचे सोंग पाहण्यासाठी नागरिक येतात. अशा सर्वाचा शिवसेनेवर कोणत्याच प्रकारचा फरक पडणार नाही. यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मनसेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरे अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात टीका करत होते आता त्यांची बाजू मांडत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या वरती राज ठाकरे यांनी अनेक वेळा टिका केली. आता त्यांना भेटायला उत्तर प्रदेशला जाणार आहेत. राज ठाकरे यांचे वेळोवेळी बदललेले विचार हे त्यांनी घेतलेले सोंग नाहीतर काय आहे ? असे उत्तर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी आज माध्यमांसमोर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!