Share

सजला वंचितांचा ‘गोपीनाथ गड’ आपल्या गोतावळ्या साठी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या १२ डिसेंबर रोजी म्हणजे उद्या दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती. त्यानिमित्त भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. ‘सजला वंचितांचा ‘गोपीनाथ गड’ आपल्या गोतावळ्यासाठी’ अशी ओळ त्या फोटोखाली त्यांनी लिहीली आहे. यानिमित्ताने गोपीनाथ गडाला सजवण्यात आले असून त्याचे मनमोहक फोटो पंकजा यांनी शेअर केले आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही विविध कार्यक्रम होणार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले असून गोपीनाथ गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या सोबत यंदाची जयंती साजरी करावी, असे आवाहन पंकजा यांनी आपल्या समर्थकांना केले आहे. विशेष म्हणजे पंकजासुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.

या पत्रात पंकजा म्हणतात, १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले.

अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात. कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं या पत्रात पंकजा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!