Share

गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) हे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. मलिकांनी आपल्या घरी इडी अथवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे सूचक ट्वीट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’मित्रांनो, मी ऐकले आहे की आज माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, आम्हाला घाबरायचे नाही, लढायचे आहे. गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.’

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. त्यामुळे नवाब मलिकांवर ईडीची धाड पडणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. त्यातच आता मलिकांच्या ट्विटमुळे ही शक्यता खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!