Karuna Munde | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे- फडणवीस सरकारमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी (Karuna Munde) खळबळजनक दावा केला आहे. माझ्या शापामुळेच महाविकास आघाडी सरकार पडले. हे सरकार परत येणारच नाही, असं वक्तव्य करुणा मुंडेंनी केलं आहे.
“भाजप सरकारच योग्य आहे. एका बापाचे असाल तर मला बीडमध्ये निवडणुकीत हरवून दाखवा”, असं आव्हानही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. “आपल्या किंवा मुलांच्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील”, असे करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या, माझ्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. गाडीमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती. दोनदा तुरुंगात डांबण्यात आलं. सध्या माझ्या घरावर धनंजय मुंडेंचा डोळा आहे. मात्र मी घाबरणार नाही, असे मुंडे म्हणाल्या आहेत. ताकद असेल तर माध्यमांसमोर घराचे कागद घेऊन या, त्यावर मी सही करेन, असं आव्हानही करुणा यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे मला खूप त्रास देत आहेत. मुलांनाही घाणेरड्या धमक्या देत आहेत. त्यांनी बनावट खोटे व्हिडीओ माझ्या नावाने व्हायरल केले आहेत”, असा दावा मुंडे यांनी केला आहे. “माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार पडलं आहे”, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule । अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,
- Karuna Sharma | “माझ्या जीवाला काही झालं तर धनंजय मुंडे जबाबदार” ; करुणा मुंडेंचा गंभीर इशारा
- Urfi Javed | संपूर्ण शरीराला बँडेज पट्टी! उर्फी जावेदचा नवा लुक
- Ramdas Kadam । अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; ‘या’ नेत्यांवर टीका करत म्हणाले,
- Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून गदारोळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने शो बंद पाडला


