Share

‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’

Published On: 

🕒 1 min read

हरयाणा : एका कार्यक्रमात बोलत असतांना हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर(Manohar Lal Khattar) यांनी मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे, असे म्हणत सरकार हे होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री म्हणाले की,’मला किंवा सरकारला यापासून कोणतीच अडचण नाही. प्रत्येकाला आपल्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे.परंतु प्रत्येकाने मर्यादेत राहून हे कार्य केले पाहिजे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी, दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे. सरकार हे होऊ देणार नाही.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’यापूर्वी प्रशासनाने काही ठिकाणी नमाज पठणासाठी परवानगी दिली होती, परंतु नंतर ती मागे घेण्यात आली. अशाप्रकारे सर्वांनाच मनमानी करू दिली, तर राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल. सरकारला मुस्लिमांची कोणतीही अडचण नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे धार्मिक कार्य करू शकतात पण खुल्या जागेत नाही’, असे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!