🕒 1 min read
Dhananjay Munde | मुंबई : कर्नाटक – महाराष्ट्र (Karnataka-Maharashtra) सीमावाद विकोपाला पोहचला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संताप व्यक्त करत इशारा दिला आहे.
कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का? हे तातडीने न थांबल्यास मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
तसेच, कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sambhajiraje Bhosale | “… नाहीतर मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे भोसले यांचा इशारा
- Shambhuraj Desai | “उद्धव ठाकरे अडीच वर्ष कुणापुढे झुकले…”; शंभूराज देसाईंची बोचरी टीका
- Sharad Pawar | शंभूराज देसाईंविषयी प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “मी अशा लहान लोकांबाबत…”
- Jitendra Awhad | मराठी माणूस षंढ आहे, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी समजू नये – जितेंद्र आव्हाड
- Ajit Pawar | “राज्यपालांना पदावरून हटवले तरी…” ; अजित पवार यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
