Share

Pankaja Munde | गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण; म्हणाल्या, “महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांचं…”

Published On: 

🕒 1 min read

Pankaja Munde | बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) याची आज जयंती आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गोपीनाथ गडावर जात त्यांना अभिवादन केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानाच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त केले. तर महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,“महापुरुषांविषयी बोलणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपण बोलायचं असतं. एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने बोलते, तेव्हा एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून बोभाटा करणं हादेखील महापुरुषाचा अवमान करणंच आहे. त्या भावना चुकीच्या पद्धतीने कशा पोहोचतील हे पाहणंही महापुरुषाचा अपमान आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “मी थकणार नाही. मी रूकणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. हा गोपीनाथ मुंडेचा ध्यास होता. त्याच मार्गाने मी पुढे जातेय. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही.”

राजकारणात संयम लागतो, तो आमच्यात आहे. मला लोकं म्हणाले तुम्ही आज काय बोलणार. मुंडे साहेबांचा वाढदिवस आम्ही कधीच मोठा साजरा केला नाही, लोकांनी केला असेल. टाळ वाजवण्यासाठी जर नियम असतील तर देश आणि राज्य चालवण्यासाठी देखील नियम असतात. विरोधकांसाठी नियम आहेत, सत्ताधारांसाठी नियम असून, मिडियासाठी देखील नियम असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!