मुंबई : केंद्र शासनाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्यावर अंमलबजावणी न झाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? उलट ‘मनरेगा’सारख्या प्रकल्पांची आर्थिक रसद तुटल्याने लाखो शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत आहे. प्रत्यक्षातले चित्र भेसूर आहे.’ तसेच पुढे ते म्हणाले की,शेतकरी आंदोलनाच्या अंतिम विजयाने देशभरातील शेतकऱ्यांचे दुःख आणि वेदना जगासमोर आली. स्वातंत्र्याचा लढा शेतकरी, मजूर व आदिवासींचा होता. ब्रिटिश साम्राज्यालाही त्यापुढे झुकावे लागले. आताही त्याचीच पुनरावृत्ती घडली, त्यासाठी शेतकऱ्यांचे अभिनंदन. ३७८ दिवसांनी तंबू मोडून ते घरी निघाले आहेत. त्यांच्या संघर्षाला साष्टांग दंडवत.
दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ३७८ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपले आहे. केंद्र सरकारने आडमुठेपणा सोडून तीन कायदे मागे घेतले. गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेशी चर्चा घडवून आणली. अहंकाराची भिंत तुटली व शेतकरी आपापल्या घरी परतू लागले आहेत. शेतकऱ्यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवल्याचा जो आनंद आणि जल्लोष साजरा झाला तोच आनंद दिल्लीच्या सीमेवर साजरा होताना दिसत आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “नवाबजी, ‘त्या’ शब्दाचा अर्थ तुम्ही राऊतांना विचारायला हवा होता”
- आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवलं पाहिजे; अजित पवारांचा आशिष शेलारांना टोला
- आरोग्य विभागाच्या पेपरफूटीवर अजित पवार म्हणतात, त्याच्यावर…
- चक्क सलमान खानच्या बहिणीने केले कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

