मुंबई : सध्या राज्यात आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात मोठे वादंग सुरु आहे. पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होऊ लागल्याने या परीक्षेतील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर आली आहे.
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या ही परीक्षा देणाऱ्या सुमारे 10 लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नसून विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली आहे.
आरोग्य खात्यातील 6 हजारांहून अधिक जागांची भरती रखडवून ठाकरे सरकारने उमेदवारांना नैराश्यात ढकलले होते. वारंवार मागणी करूनही परीक्षांबाबत चालढकल करण्यात येत होती. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या एजन्सीला परीक्षांचे कंत्राट देण्यासाठी त्यांच्या सोयीकरिता तब्बल 21 वेळा निविदेत बदल करण्यात आला, तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता.
परीक्षांच्या काही तास अगोदर काही उमेदवारांना व्हॉटस अॅप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाल्या, अखेरच्या क्षणी वेळापत्रक बदलून परिश्रमपूर्वक तयारी करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली, तरीही आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र, एजन्सीची पाठराखण करून परीक्षा वेळेवर व पारदर्शक होण्याच्या बढाया मारत होते.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांचे मोठे वक्तव्य; बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…
- ओमायक्रॉनचा संसर्ग आणि राज्यातील शाळा यावर अजित पवारांचं मोठं विधान
- अभिनेत्री संयतिका बॅनर्जीचा गंभीर अपघात; धडकेत कारचा चुराडा
- आता ‘शिवसेना’ पर्व सुरू झाले आहे-पालकमंत्री सुभाष देसाई
- रवी शास्त्री यांनी भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंवर दिली मोठी प्रतिक्रिया


