🕒 1 min read
भारतीय क्रिकेट संघात मधल्या फळीत येऊन तडाखेबाज खेळी करणारा सुरेश रैनाच्या वडिलांचे आज राहत्या घरी निधन झाले. सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी लढत होते. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. सुरेश रैना हा भारताचा कसोटी, एकदिवीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक झळकावणारा भारताचा पहिला खेळाडू आहे. भारतीय लष्करात आपली सेवा देणारे त्रिलोक चंद रैना हे मूळचे काश्मिरी पंडित होते.
भारतीय लष्करात काम करताना त्यांच्याकडे ऑर्डीनन्स कारखान्यात बॉम्ब बनवायचे काम असायचे. तत्रिलोक चंद रैना मूळचे जम्मू आणि काश्मीर या राज्याचे होते, परंतु १९९० च्या दशकाच्या सुरवातीला काश्मिरी पंडितांच्या हत्येला सुरुवात झाली आणि रैना कुटुंबीय काश्मीर खोर सोडून उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद शहरात आले. त्रिलोक चंद रैना यांना २ मूल आणि २ मुली अशी आपत्य आहेत.
तरी सुरेश रैना याचे वडील त्रिलोक चंद रैना यांच्या मृत्यूनंतर अनेक क्रिकेट खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेश रैना याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंघ धोनी याच्या नंतर लगेच निवृत्ती घोषित केली. सुरेश रैना यंदाची २०२२ मधील आयपीएल स्पर्धा खेळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘तुझी हिम्मत कशी झाली…’; जेव्हा लतादीदींसाठी बाळासाहेबांनी गुलशन कुमार यांना झापलं होतं
- U19 CWC : भारतीय संघ पाचव्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन
- बाळासाहेबांनंतर लतादीदी आमच्या आधार होत्या, रश्मी ठाकरे भावुक!
- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले-नाना पटोले
- “नं. १ सिएमच्या शहराला…”; अमृता फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
