Share

U19 CWC : भारतीय संघ पाचव्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन

Published On: 

मुंबई: यश धूलच्या नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या संघाचा चार गाडी राखून पराभव केला. हे १९ वर्षांखालील भारतीय संघाचे ५ वे विश्वविजेतेपद होते. याआधी भारतीय संघाने २०००, २००८,२०१२ आणि २०१८ मध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक उंचावला होता. २००० मध्ये मोहमद कैफ, २००८ मध्ये विराट कोहली , २०१२ मध्ये उन्मुक्त चंद आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक उंचावला होता. तर आता यश धूलच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल ५ वेळा १९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला आहे.

स्पर्धेतच्या सुरुवातीलाच कोरोनाग्रस्त झालेल्या भारताच्या यंग ब्रिगेडने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्या अगोदर भारतीय क्रिकेट संघातील बरेच खेळाडू हे कोरोना विषाणूने बाधित झाले असताना सुद्धा भारतीय संघाने विपरीत परिस्थितीवर मात करीत हा अंतिम सामना जिंकला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्यांच्यासाठी बक्षीसही जाहीर केले आहे.

कौतुकाची थाप म्हणून बीसीसीआय संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख रुपये देणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज वी.वी.एस लक्ष्मण याच्या नेतृत्वाखाली हा संघ तयार झाला आहे. यश धुलच्या कर्णधारपदात वेस्टइंडीज मधील अँटीग्वा येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम  सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा संघ केवळ १८९ धावांवर सर्वबाद झाला.

इंगलंडच्या जेम्स रेईव्हच्या ९३ धावांच्या खेळीने त्यांना चांगल्या स्तिथीत आणले होते. भारताकडून गोलंदाजी करताना राज बावा याने ५ बळी पटकावले . १८९ धावांचे पाठलाग करताना भारताकडून उपकर्णधार शेख राशिद आणि निशांत सिंधूने अर्धशतक झळकवले. तर शेवटी महेंद्र सिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून देत निशांत सिंधूने जिंकण्यासाठी एक धाव बाकी असताना सिक्सर मारत भारतीय संघाचा विजय संपादित केला.

         महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!