🕒 1 min read
मुंबई: लता दीदी आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्याच आमच्या आधार होत्या. सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackrey) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर(Late Mangeshkar) कायमच्या आपल्यातून निघून गेल्या आहेत. आज (दि.६) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली आहेत. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता.
लता दिदी आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्याच आमच्या आधार होत्या, सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 6, 2022
यामुळेच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतांनाच आज त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आरोग्यासाठी लाखो चाहत्यांनी प्रार्थना केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच लता दिदिंच्या जाण्याने आपण पुन्हा एकदा पोरके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
