Share

“नं. १ सिएमच्या शहराला…”; अमृता फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘मला जे काही दिसतं मी त्याबद्दल बोलत असते. मला खड्डे, वाहतूक कोंडीचा किती त्रास होतो, हे मला माहित आहे. मी एका सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. मी जे काही बोलते ते एक सामान्य नागरिक म्हणून बोलते. त्यामुळे तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे. मानसिक संतुलन गेलाय, अशी भाषा करणे योग्य नाही. आज मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, कारण की लोकांना घरी वेळ देता येत नाही, हे सर्व बंद झाल पाहिजे. त्यासाठी बोलले पाहिजे.’ असे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बायको अमृता फडणवीस यांनी केले होते. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

याच मुद्द्यावर आज मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते,’कॉमेडीला टीव्हीवर राहू देत, आपण राजकीय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं. शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. निवडणूक सुरु होतील तेव्हा आपण त्यावर बोलू. चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ.’

आता त्याला अमृता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या,’छोटे राजा साहेब, ह्या पेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते की नं. १ सिएमच्या शहराला इंट को. टॉमटॉम
(Int Co.TomTom) च्या ट्राफिक इंडेक्स अहवाल (Traffic Index Report) मध्ये जगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी असणारे शहर (City with World’s Worst Traffic’ चा No.1) क्रमांक दिला गेला आहे. जगात सर्वाधिक-65% गर्दीची पातळी (Congestion level) असल्यामुळे मुंबई दरवर्षी 41,000 Cr+ चे आर्थिक नुकसान सोसत आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!