मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या लिलावात अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. यामध्ये सुरेश रैना, इशांत शर्मा, स्टीव्ह स्मिथ आणि आरोन फिंच यांच्याशिवाय मोहित शर्माच्या नावाचाही समावेश होता. या खेळाडूंची विक्री न झाल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, पण आता वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून काम करणार असल्याने लोकांना मोठा धक्का बसला आहे. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या मोहितला गुजरात टायटन्सने आपल्या संघासाठी नेट गोलंदाज म्हणून ठेवले आहे. यासोबतच बरिंदर सरन हासुद्धा गुजरातचा नेट बॉलर असेल.
मोहितने २०१४ साली आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने १६ सामन्यात २३ विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला. मात्र, मोहित एके दिवशी कोणत्याही संघाचा नेट बॉलर होईल याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. मोहितच्या कारकिर्दीत झालेली ही घसरण पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. मोहित आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. त्याने ८६ आयपीएल सामन्यात एकूण ९२ विकेट घेतल्या आहेत.
Seeing Mohit sharma as a
net bowler is killing me ???? https://t.co/2o0UHfwx1N— Tapioca ???? (@Meeram_0fl) March 17, 2022
Mohit Sharma as Net bowler..Who has 92 wickets on his name. Used to be prime bowler in 2015 era. How life turns the table ! https://t.co/DxKiTTOQYB
— Banna. (@iJaideep_) March 18, 2022
मोहित शर्माने भारतासाठी २६ एकदिवसीय आणि ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे ३१ आणि ६ विकेट घेतल्या आहेत. त्याने भारताकडून शेवटचा सामना २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. मोहितने दिल्ली कॅपिटल्ससाठी २०२०मध्ये शेवटच्या वेळी आयपीएलमध्ये प्रवेश केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सोबतचे वाद विसरत गंभीरने केले कौतुक; म्हणाला “तो १०० शतक…”
- भगवंत मान यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पडला पार!
- “सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- “…महाराष्ट्रातही आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा”- आचार्य तुषार भोसले
- “चित्रपटावरच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार घालायला हवा..” ‘बच्चन पांडे’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

