Share

Washington Sundar | वॉशिंग्टन सुंदरने न्युझीलँडच्या मैदानावर केला पराक्रम, सुरेश रैना आणि कपिल देव यांचे तोडले रेकॉर्ड

Published On: 

🕒 1 min read

ऑकलँड : ऑकलँडमध्ये पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) ने आपल्या फलंदाजीने आश्चर्यचकत कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली आहे. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडूत 37 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा अधिक होता. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले आहे. या खेळीनंतर वॉशिंग्टन सुंदरने माजी दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचे विक्रम मोडले आहेत.

वॉशिंग्टन सुंदरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनचा न्यूझीलंडच्या भूमीवरील एक विक्रम मोडला आहे. न्युझीलँडमध्ये एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 धावा करणाऱ्या सुरेश रैनाला वॉशिंग्टन सुंदरने काल मागे टाकले आहे. 2009 मध्ये रैनाने न्यूझीलंडविरुद्ध 18 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 211.11 चा होता. तर 1992 मध्ये कपिल देव यांचा स्ट्राईक रेट 206.25 होता. कालच्या सामन्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदरचा स्ट्राइक रेट 231.25 होता. या स्ट्राइक रेट नंतर वॉशिंग्टनने सुरेश रैना आणि कपिल देव यांना मागे सोडले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या सामन्यात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला होता. वॉशिंग्टनने मैदानावर येताच आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने शेवटच्या षटकांमध्ये 16 दोन मध्ये 36 धावा केल्या. वॉशिंग्टनने या खेळी दरम्यान अनेक उत्कृष्ट शॉट मारले. तर 49 व्या षटकात हेनरीविरुद्ध मारलेला शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरने आपल्या सर्वोत्तम गुणाचे प्रदर्शन केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करत भारत आणि न्यूझीलंडला 307 धावांचे  लक्ष दिले होते. या सामन्यामध्ये न्युझीलँडने सात गडी राखून भारताचा पराभव केला आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने नाबाद 145 आणि कर्णधार केन विल्यमसनने नाबाद 94 धावा करत जेतेपद आपल्या नावावर केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!