Share

IPL 2022: आयपीएल आधी शास्त्री मास्तर संतापले ; बीसीसीआयच्या घटनेला मूर्ख म्हणत फटकारले

Published On: 

मुंबई: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएल सुरु होण्यापूर्वी बीसीसीयायला फटकारले आहे. रवी शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयच्या घटनेतील एका नियमामुळे त्यांना मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना आयपीएलमध्ये कमेंट्री करण्यापासून रोखले गेले. आता त्यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी बीसीसीआयवर या संबधी टीका केली आहे.

बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधत रवी शास्त्री म्हणाले , “ही आयपीएलची १५ वी आवृत्ती आहे, मी पहिली ११ वर्षे कमेंट्री केली आणि नंतर घटनेत काही मूर्खपणाच्या conflict of interest conflict of interestनियमामुळे मला गेल्या वर्षी ते करता आले नाही,” रवी शास्त्री (Ravi shastri) लवकरच सुरेश रैनासह (suresh raina) कमेंट्री बॉक्समध्ये परतणार आहे. रैनाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, “तुम्ही त्याला मिस्टर आयपीएल म्हणता, मी असहमत होऊच शकत नाही. त्याने आयपीएल उजळले, एकही सामना न गमावता एका संघासाठी सलग सीझन खेळणे ही खरोखरच मोठी प्रशंसा आहे. तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.”

पुढे शास्त्री म्हणाले की, आयपीएलच्या प्रत्येक आवृत्तीत काही खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आहे. “आयपीएलचे सौंदर्य हे आहे की ते तुम्हाला आश्चर्यचकित करत राहते. गेल्या आयपीएलमध्ये आपण व्यंकटेश अय्यरला पाहिले होते, त्याच्याबद्दल कोणीही ऐकले नव्हते आणि स्पर्धा संपली तोपर्यंत तो भारतीय संघात होता. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करायला मिळते.”

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!