Share

‘तुझी हिम्मत कशी झाली…’; जेव्हा लतादीदींसाठी बाळासाहेबांनी गुलशन कुमार यांना झापलं होतं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबाचं नातं नेहमीच जिव्हाळ्याचं राहिलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे पितृतुल्य होते. एकदा लतादीदींची मूळ गाणी डब करण्याचे काम करणाऱ्या गुलशन कुमार यांना बाळासाहेबांनी चांगलंच झापलं होतं. ९०च्या दशकात बॉलीवूड म्युझिक इंडस्ट्रीत टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांचा दबदबा होता. तेव्हाच हा प्रसंग आहे.

गुलशन कुमार आणि पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यात व्यावसायिक भागीदारी होती आणि म्युझिक विश्वात टी-सीरिजच्या कॅसेट्सचाच आवाज तेव्हा घुमत होता. त्यातही मूळ गाणी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात डब करून त्याच्या कॅसेट्स मोठ्या प्रमाणात बाजारात आणल्या जात होत्या. १९९२ मध्ये गोविंदा आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राधा का संगम या चित्रपटाच्या निमित्ताने यावरून मोठं वादळ उठलं होतं.

चित्रपटातील गाणी लता मंगेशकर यांनीच गावीत असा संगीतकार अन्नू मलिक यांचा आग्रह होता. मात्र, गुलशन कुमार यांना ते मान्य नव्हते. मग अनुराधा पौडवाल यांच्याच आवाजात ती गाणी प्रदर्शित व्हावीत म्हणून चित्रपटाच्या संगीताचे सर्व हक्क गुलशन कुमार यांनी विकत घेतले.

हा सर्व प्रकार बाळासाहेबांच्या कानावर पडला तेव्हा बाळासाहेब भडकले आणि थेट गुलशन कुमार यांना फोन लावला. हे करण्याची तुझी हिम्मत कशी झाली?’, असे विचारत त्यांना झापले. लता मंगेशकर हा महाराष्ट्राचा गौरव आहे. त्यांचा आवाज हटवून दुसऱ्या कुणाचातरी आवाज तिथे घुसडण्याचं धाडस तू केलसंच कसं?, असं दरडावत बाळासाहेबांनी थेट धमकीच दिली. अखेर गुलशन कुमार यांनी माघार घेत सर्व गाणी लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!