मुंबई: आयपीएलचा १५ वा सीझन सुरू होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने CSK च्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला ४ वेळा चॅम्पियन बनवले आहे. पण, आता अशा बातम्या येत आहेत की, धोनीचे कर्णधार आणि खेळाडू म्हणून हे वर्ष शेवटचे असेल. अशा परिस्थितीत सुरेश रैनाने ज्या खेळाडूंची पुढील कर्णधार म्हणून निवड केली आहे, तेव्हापासून तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
सुरेश रैनाने (suresh raina) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना धोनीनंतर सीएसकेचे नेतृत्व करू शकतील अशा चार खेळाडूंची नावे उघड केली होती. त्याने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो आगामी काळात CSK चे कर्णधार बनू शकतात. आणि खेळ चांगल्या प्रकारे समजून ते धोनीची जागा घेऊ शकतात.’ मग काय रैनाच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर त्याला ट्रोल करणे सुरु केले.
Thodi bohot jo chance thi wo is statement k baad khatam hogayi????
— Inside-Crypto (@funnykomalleone) March 22, 2022
"Ravindra Jadeja, Ambati Rayudu, Robin Uthappa and DJ Bravo can lead the side. They are capable, know the game very well and can be a successor for MS Dhoni." – Suresh Raina
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 22, 2022
Kabhi kabhi itne Experience hokar bhi kya bolte hai inko pata nahi hota…next Year Uthappa aur Rayudu 37 k honge bravo 39 ka hoga…Form fitness ka issue to hai hi inka abhi…Kese future captain ho sakte hai ye????????????????
— CricMeji (@mehjul257) March 22, 2022
https://twitter.com/jaanekyabaathai/status/1506310716650766336?s=20&t=nCW1oMnWeSZBHk_ojRSV5w
सुरेश रैना यावर्षी आयपीएल खेळणार नाही. तो मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र यावेळी तो एका नव्या अंदाजात स्पर्धेत दिसेल. रवी शास्त्री सोबत तो कमेंट्री बॉक्समध्ये सामन्यांवर समीक्षा करताना दिसेल. आयपीएल सुरु व्हायला अजून दोन दिवस बाकी असताना रैनाच्या विधानाने त्याला अडचणीत आणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे” – चंद्रकांत पाटील आक्रमक
- सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने मुंबईत खरेदी केला हक्काचं घर
- IPL 2022 : धोनीने दिला चाहत्यांना शब्द; २०२२ नंतरही खेळणार आयपीएल !
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय?- किरीट सोमय्या
- IPL 2022 : ओल्ड इज गोल्ड..! स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी विराटनं शेअर केला जुना फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

