🕒 1 min read
मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सध्या तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख
(Anil Deshmukh) यांची पाठराखण करत ‘गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’, असे म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत भुजबळ यांना टोला लगावला आहे.
‘कोण देताय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’ इति छगन भुजबळ. खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून कराडो रुपये मिळत असतील तर कोण कशाला पोलिसां कडून खंडणी वसूली करेल? असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान सोलापूर दौऱ्यावर गेलेले छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले की, ज्या वाझेला अटक झाली आहे तो चांदीवाल आयोगासमोर सांगतो की अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे? याचा अर्थ काही करून त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचे आणि असे मोठे १०० कोटी, ५०० कोटी, १००० कोटी असे आरोप ठेवले की मग ईडीची केस मजबूत करायची आणि जास्तीत जास्त तुरुंगात ठेवायचं हा प्रकार आहे ईडीचा. अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ईडीवरही टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
“मुंबई पोलीस बारमध्ये येऊन झोपतात, महिला…”, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल
“दुसरो को खामखा बदनाम करनेवाले…”, संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
“ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, ‘मनसे’ची राऊतांवर टीका
IPL 2022 LSG vs DC : दिल्लीचं लखनऊला दीडशे धावांचं आव्हान; मुंबईकर पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी!
वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
