🕒 1 min read
मुंबई: मुंबईतील ऑर्केस्टा आणि डान्स बार मालकांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत असे अनेक बार मालक आहेत ज्यांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. स्थानिक पोलिसांकडून आम्हाला खूप त्रास होत आहे. पोलिस रात्री नऊ वाजल्यापासूनच फेऱ्या मारतात. डान्सर्स आणि गायकांचे फोटो काढतात. त्याचा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होत असल्याचे या बार मालकांनी म्हटले आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
“मुंबई पोलिस बारमध्ये येऊन झोपतात, महिला डान्सरचे फोटो काढतात अशी बारमालकांची तक्रार आहे. बार मालकांकडून खंडणी गोळा करण्यासाठी फिरून फिरून दमत असतील बिचारे. सचिन वाजे तुरुंगात असला तरी खंडणी वसुलीचे व्रत मात्र जोरात चालू असावे. गृहमंत्र्यांचे लक्ष आहे का? यथा राजा तथा प्रजा.”, अशी टीका करत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला आहे.
दरम्यान काही डान्सबार मालकांनी दावा केला आहे की, पोलीस त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात की, त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे. ज्याचे ते पालन करत आहेत. मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत. बारमालकांनी याबाबत AHAR कडे तक्रार केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“दुसरो को खामखा बदनाम करनेवाले…”, संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
“ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, ‘मनसे’ची राऊतांवर टीका
IPL 2022 LSG vs DC : दिल्लीचं लखनऊला दीडशे धावांचं आव्हान; मुंबईकर पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी!
वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर
“आता जसजशी त्यांची पाऊलं पडतील तशीच आमचीही पडतील”- राऊत कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
