मुंबई : आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आज स्पर्धेचा १५वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचे अर्धशतक आणि कप्तान ऋषभ पंतने शेवटी जोडलेल्या महत्त्वपूर्ण धावांमुळे दिल्लीने लखनऊला २० षटकात १५० धावांचे आव्हान दिले आहे. दिल्ली संघात डेव्हिड वॉर्नर आणि एनरिक नॉर्किया यांचे आगमन झाले असून लखनऊने मनीष पांडेला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दिल्लीचा डाव
मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ आणि तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीला जबरदस्त सुरूवात करून दिली. यात पृथ्वीचा सिंहाचा वाटा होता. पहिल्या गड्यासाठी दोघांनी ६७ धावा जोडल्या. पृथ्वी अर्धशतक ठोकून कृष्णप्पा गौतमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पृथ्वीने ९ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. पृथ्वी बाद झाल्यानंतर दिल्लीने वॉर्नर (४) आणि रोवमन पॉवेल (३) यांना स्वस्तात गमावले. फिरकीपटू रवी बिश्नोईने दोघांना तंबूत पाठवले. गती मंदावलेल्या दिल्लीला कप्तान ऋषभ पंतने १६व्या षटकात शतकी पल्ला गाठून दिला. ऋषभला सरफराज खानची साथ लाभली. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे दिल्लीला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. २० षटकात दिल्लीने ३ बाद १४९ धावा केल्या. पंतने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ तर सरफराजने ३ चौकारांसह ३६ धावांची नाबाद खेळी केली.
दोन्ही संघांची Playing XI
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, एनरिक नॉर्किया.
महत्त्वाच्या बातम्या –
- मंदिरांवर लावण्यासाठी मोफत भोंगे देणार- मोहित कंबोज
- IPL 2022 : मुंबईचा जसप्रीत बुमराह आणि कोलकात्याच्या नितीश राणावर दंडात्मक कारवाई!
- “मंत्र्यांवर अनेक आरोप असूनही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा अट्टाहास”- पंकजा मुंडे
- “न्यायव्यवस्थेचा निर्णय सगळ्यांनाच बांधील…”- अजित पवार
- “वय फक्त आकडाच, कार्तिक अजूनही भारतासाठी वर्ल्डकप खेळू शकतो”, आकाश चोप्राचं मत!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

