Share

“ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, ‘मनसे’ची राऊतांवर टीका

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) काल (७ एप्रिल) मुंबईत दाखल झाले. ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर ते काल मुंबईत विमानतळावर दाखल होताच शिवसेनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत राऊतांना टोला लगावला आहे.

“स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले,11 कोटीची संपत्ती जप्त झाली म्हणून ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत दाखल होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात ‘योद्धे’ असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली. शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजपने मात्र सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 LSG vs DC : दिल्लीचं लखनऊला दीडशे धावांचं आव्हान; मुंबईकर पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी!

वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर

“आता जसजशी त्यांची पाऊलं पडतील तशीच आमचीही पडतील”- राऊत कडाडले

IPL 2022 LSG vs DC : देखो वो आ गए..! टॉसदरम्यान दिल्लीनं दिली खूशखबर; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI

मंदिरांवर लावण्यासाठी मोफत भोंगे देणार- मोहित कंबोज

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!