Share

“दुसरो को खामखा बदनाम करनेवाले…”, संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर ईडी नामक ग्रह लागल्याचे दिसून येत आहे. ईडीने त्यांची मुंबई आणि अलिबाग येथील संपत्ती जप्त केली आहे. मात्र अशा कारवायांना आम्ही घाबरणार नाही. देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला आहे.

 “दुसरो को खामखा बदनाम करनेवाले, अपने गिरेबान में झांककर देख तुझसे ‘मैला’ कोई नही इस दुनिया में”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत काल मुंबईत विमानतळावर दाखल झाले. यावेळी शिवसेनेकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत दाखल होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात ‘योद्धे’ असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली. शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजपने मात्र सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

“ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, ‘मनसे’ची राऊतांवर टीका

IPL 2022 LSG vs DC : दिल्लीचं लखनऊला दीडशे धावांचं आव्हान; मुंबईकर पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी!

वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर

“आता जसजशी त्यांची पाऊलं पडतील तशीच आमचीही पडतील”- राऊत कडाडले

IPL 2022 LSG vs DC : देखो वो आ गए..! टॉसदरम्यान दिल्लीनं दिली खूशखबर; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!