Share

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा दिलासा! सुटकेचा मार्ग मोकळा, उद्या येणार तुरुंगातून बाहेर

Published On: 

🕒 1 min read

Anil Deshmukh | मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे देशमुख यांच्या अर्जावर स्थगिती वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने फेटाळली आहे. अशा स्थितीत अनिल देशमुख आता उद्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहेत.

अनिल देशमुख यांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अनिल देशमुखांतर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी सीबीआयच्या याचिकेला विरोध केला.

सीबीआयने अनिल देशमुख यांना यावर्षी एप्रिलमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. देशमुख यांची प्रकृती लक्षात घेता भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीला प्राधान्य द्यावे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले होते.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!