🕒 1 min read
पुणे : ” भाजप हा पक्ष केवळ १९८० मध्ये स्थापन झालेला नसून, भाजप पक्षाला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभला आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.” कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे आज मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात शांतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या आणि मल्हार पांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘भाजप काल आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदुत्वाच्या विचारधारेवर वाटचाल करणारा भाजप हा केवळ 1980 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय पक्ष नसून याला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेला आहे. म्हणून आमच्यामुळे भाजप ग्रामीण भागात दारोदारी पोहोचला अशा गमजा किंवा फुशारक्या मारणा-यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. हिंदू विचार हा केवळ कर्मकांडांशी जोडलेला नसून संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेला आहे.”
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माळशिरसचे आमदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राम सातपुते आणि विधान परिषदेचे सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक, पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता, पुस्तकाचे अनुवादक मल्हार पांडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी, अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
