Share

दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर; नवजात मुलाचं झालं निधन!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodríguez) जुळ्या मुलांची आई होणार असल्याचे सांगितले होते. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे रोनाल्डोने सांगितले.

रोनाल्डोने इंस्टाग्रामवर म्हटले, ”आमच्या मुलाचे निधन झाल्याचे अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे. कोणत्याही पालकांसाठी हे सर्वात मोठे दु:ख आहे. फक्त आमच्या मुलीचा जन्म हा क्षण थोडी आशा आणि आनंदाने जगण्याची शक्ती देत आहे. मी सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी खूप काळजी घेतली.”

https://www.instagram.com/p/CcgHsWLLaf5/

रोनाल्डोचा राष्ट्रीय फुटबॉल संघ पोर्तुगाल नुकताच युरोपियन पात्रता प्लेऑफमध्ये नॉर्थ मॅसेडोनियाचा २-० असा पराभव करून फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला. रोनाल्डोचा हा पाचवा फिफा विश्वचषक असेल. दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने ८००हून अधिक गोल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!