पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मंगळवारी पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना काही पक्षांना हिंदुत्वाची शाल पांघरावी लागत आहे असे म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
हा टोला नेमका कोणाला होता? जुन्या मित्राला की होऊ घातलेल्या नव्या मित्राला? निशाणा कोणाकडे आहे? असा सवाल पत्रकारांनी केला असता फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी १५-२० वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खरं हिंदुत्व कोणाच्या रक्तात आहे. त्यामुळे ते पुस्तक जरूर वाचावं. त्याची माहिती मी तुम्हाला देईल. मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही समजलं आहे आणि जनतेलाही समजलं आहे”.
पुढे राज ठाकरेंनी देखील शाल पांघरलेली दिसतेय. ती जुनी शाल आहे की नवी शाल आहे? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांची शाल जुनी आहे की नवी हे येणारा काळ ठरवेल. तसेच आमचा घाव वर्णी बसला आहे. भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यामुळे भाजपाचा पोलखोल दौरा थांबणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

