मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) स्पर्धेची रणधुमाळी सुरू असताना क्रिकेटविश्वातून वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि नेदरलँड्सचा प्रशिक्षक रायन कॅम्पबेल (Ryan Campbell) हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) कोमात गेला आहे. एका मैदानात आपल्या मुलांसोबत खेळत असताना कॅम्पबेलच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला ब्रिटनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्रकार आणि कॅम्पबेलचे जवळचे मित्र गॅरेथ पार्कर यांनी सर्वप्रथम याची माहिती दिली.
रायन कॅम्पबेल २०१७ पासून नेदरलँड संघाचा प्रशिक्षक आहे न्यूझीलंडच्या नेदरलँड दौऱ्यानंतर तो युरोपला परतत होता. यादरम्यान त्याने पर्थमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र पारकर यांचीही भेट घेतली. तो त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग या दोन्ही संघांसाठी खेळला. २००२ मध्ये त्याला अॅडम गिलख्रिस्टच्या जागी ऑस्ट्रेलियाकडून दोन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, त्याने हाँगकाँगसाठी २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता.
EXCLUSIVE: Popular WA cricketer @cambo_19 fighting for life in London hospital. @WACA_Cricket
LISTEN ????https://t.co/tZ7hjfZjwy
— Breakfast with Millsy & Karl (@6PRbreakfast) April 18, 2022
५० वर्षीय कॅम्पबेल सध्या कोमात जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सीईओ क्रिस्टियाना मॅथ्यूज यांनी एक निवेदन जारी करून त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकबझच्या बातमीनुसार, मॅथ्यूज म्हणाले, “कॅम्पबेलच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी ऐकून वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेटला धक्का बसला आहे. क्रिकेट कर्मचारी, खेळाडू आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सर्व क्रिकेट समुदायाच्या वतीने, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत. आम्हाला आशा आहे की तो लवकरच बरा होईल.”
रायन कॅम्पबेलने ४४ वर्षे ३० दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. मात्र, त्याला त्याच्या कारकिर्दीत केवळ एकच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने २ एकदिवसीय सामन्यात ५४ धावा, तर तीन टी-२० सामन्यांमध्ये २६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

