Share

IPL 2022 LSG vs RCB : दोन तुल्यबळ संघांत लढत; लखनऊनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) सामना होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे.

लखनऊचा संघ सहापैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बंगळुरूच्या संघानेही सहा पैकी चार सामने जिंकले असून गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहे. लखनऊने त्यांच्या मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला होता. कर्णधार केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने गेल्या सामन्यात शतकही केले होते. क्विंटन डी कॉकही चांगल्या लयीत असल्याचे दिसते. मार्कस स्टॉइनिसने अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात मनीष पांडेच्या बॅटमधून धावा निघाल्या, ही संघासाठी चांगली बातमी आहे.

आरसीबी संघानेही शेवटचा सामनाही जिंकला, पण असे असतानाही आघाडीच्या फळीचे अपयश लपवता येत नाही. फाफ डु प्लेसिस आणि अनुज रावत या जोडीला चांगली सुरुवात करता आली नाही. त्याचबरोबर विराट कोहलीही सातत्य दाखवण्यात अपयशी ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेलने मधली फळी मजबूत केली असून गेल्या सामन्यातही चांगली फलंदाजी केली. दिनेश कार्तिक संघाचा समस्यानिवारक राहिला आणि त्याने अर्धशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. जोश हेझलवूडने सातत्यपूर्ण नियंत्रणासह गोलंदाजी केली असून मोहम्मद सिराजही गेल्या सामन्यात लयीत दिसला होता.

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!