🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद-जळगाव महामार्ग मागील दोन तीन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता पुन्हा एकदा फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा-फुलंब्री-खुलताबाद महामार्ग क्रमांक ७५२ या सुरु असलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजहर सय्यद व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुक्याध्यक्ष मंगेश साबळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केला आहे.
या निवेदनात म्हटलं आहे की, संबंधित कामात अनिमितता आढळून येत आहे. या रस्त्याची उंची ३०० एमएम बंधनकारक असताना हे काम १५० एमएम इतकीच उंची आहे. रस्त्याची पिक्यूसी देखील फाटत आहे. रस्त्यातून गवत उगवत आहे. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे सिमेंट व लोखंड या कामासाठी वापरण्यात येत आहे. या कंपनी व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने वारंवार तक्रार करून देखील काहीच कारवाई होत नाही, असा आरोप देखील करण्यात आला आहे.
संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा याबाबत अंशतः लॉकडाऊन संपताच ५ एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सय्यद व साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पेट दुसरा पेपर सुरळीत, ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाईन‘ पेपर
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- उघड्यावर फेकत असलेला जैविक कचरा सरपंचानी पकडला
- त्या’ वेळी प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे होती – आ. अतुल सावे
- खळबळजनक! लसीकरण केल्यानंतरही २१ जण कोरोना बाधित


