Share

त्या’ वेळी प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे होती – आ. अतुल सावे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे, त्यात शनीवार, रविवार पूर्ण लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. पहिल्या शनिवारी नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच आ. दानवे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले, परंतु, यावर आ. अतुल सावे यांनी आ. दानवे वर निशाणा साधत मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांना देखील आवाहन कारायचे होते असे खडे बोल सुनावले.

काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शहरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी तसेच उद्घाटन कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यावेळी प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवशकता होती. परंतु, सरकारच्या दबावात ती करण्यात आली नाही. आताची परिस्थिती पहाता, सर्व नागरिक, कार्यकर्ते, नेते मंडळी यांनी देखील नियमांचे पालन केले पाहिजे.

सध्या शहर पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या लॉकडाऊन मध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कोरोना नियमांचे पालन झाले तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. तसेच नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टनसिंग, सतत हात धुणे यांसारख्या गोष्टींचे पालन केले तर कोरोना पुन्हा आटोक्यात येऊ शकतो, असे आ. अतुल सावे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!