Share

शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना राजकारणात अर्धशतकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक जिवाभावाचे सहकारी देखील निर्माण केले आहेत. अगदी दिल्लीपासून ते त्यांच्या जन्मगावापर्यंत अनेक सहकारी त्यांनी जोडले व आजही ते त्यांच्या संपर्कात असतात.

राज्य विधिमंडळातील माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजसेवक ऍड. एकनाथ साळवे यांचं आज निधन झाले. एकनाथ साळवे हे शरद पवार यांचे विधिमंडळातील जुने सहकारी होते. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजताच शरद पवार यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून साळवेंसोबतचा एक जुना फोटो शेअर करत भावूक पोस्ट करून साळवेंना आदरांजली वाहण्यात आली आहे.

शरद पवार यांची पोस्ट –

माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना विधिमंडळ सदस्य म्हणून सुमारे ११ वर्षे अगदी जवळून पाहता आले. तद्नंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला.

सार्वजनिक कारकीर्दीच्या प्रारंभी त्यांनी शिक्षकी पेशा सोडून कायद्याची पदवी घेतली आणि दलित, आदिवासी, शेतकरी, खाणकामगार यांना न्याय देण्यासाठी उभे राहिले. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून त्यांनी आपले आयुष्य वंचित आणि उपेक्षितांच्या हिताकरीता झोकून दिले.

देशात सामाजिक ऐक्य असावे आणि लोकशाहीची फळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावीत यासाठी परिवर्तनाचे आंदोलन उभारले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक किसान मंचाच्या माध्यमातून ते रचनात्मक संघर्ष करीत राहिले.

ॲड. एकनाथ साळवे हे एक अतिशय विनम्र, स्वच्छ प्रतिमा असलेले, पुरोगामी व प्रतिभावान सामाजिक नेते होते. अत्त दीपो भव: ह्या बुद्धमंत्राचे आचरण व्हावे अर्थात स्वत: मध्ये प्रज्ञेचा दीप प्रज्वलित व्हावा आणि वैचारिक परावलंबन नष्ट व्हावे ही त्यांची जीवननिष्ठा होती. मानवाधिकारांचे रक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी ते सतत आग्रही राहिले.

सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख मला होत आहे. साळवेंच्या आत्म्याला चिरशांती मिळो व त्यांच्या कुटूंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.

https://www.facebook.com/PawarSpeaks/posts/1710638969113071

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!