🕒 1 min read
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेली पीएचडी एंट्रन्स टेस्ट (पेट दुसरा पेपर ) ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिली, अशी माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.
त्याचे वतीने एकूण ४५ विषयांसाठी शनिवारी पेट परिक्षा घेण्यात आली. पेट ऑनलाईन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. पहिल्या पेपरला ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ३० जानेवारी २०२१ ला ‘पेट‘चा ५० गुणांचा पहिला पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित केला. यामध्ये सहा हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १३ मार्च रोजी सकाळी १० ते १ दरम्यान दुसरा पेपर घेण्यात आला. पेट च्या दुसऱ्या पेपरला सहा हजार ३८३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ११० दहा जण अनुपस्थित होते.
ऑनलाइन परिक्षेत विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. वात्मिक सरवदे व उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी त्याचे निवारण देखील केले. पहिल्या पेपर प्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. या परीक्षेसाठी शंभर प्रश्न व ९० मिनिटांचा वेळ देण्यात आला. शंभर गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. १७ मार्च रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २० मार्च रोजी लागेल. त्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप
- धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू


