🕒 1 min read
नांदेड : वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत नांदेड जिल्ह्यात केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील तब्बल १२१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्यात आली.
घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर लहान मोठ्या व्यवसायाला मदत व्हावी या उद्देशाने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत केली जात आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या रकमेचे चेक देण्यात आले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत दिली जात आहे. त्यामुळे एखादा व्यवसाय सुरु करता येणार आहे. संसाराचा गाडा चालू राहण्यासाठी मदत केली जात आहे.
बचतगटाच्या माध्यमातून शिलाई मशीन तसेच पिठाची गिरणी –
नाम फाऊंडेशनच्या मदतीसह आता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा आत्मसन्मान करण्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत, बचतगटाच्या माध्यमातून शिलाई मशीन तसेच पिठाची गिरणी देण्याचा जिल्हा प्रशासने ठरविले आहे. गेल्या तीन-चार वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
