🕒 1 min read
बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मागे बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याची बातमी आली होती. त्यावरुन पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. यावर पंकजा मुंडेंनी चांगलाच पलटवार केला आहे.
धनंजय मुंडे पंकजा मुंडेंवर आरोप करत म्हणाले, “जिल्ह्याची बदनामी सुरु आहे. त्याला एखादा जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असेल, जिल्हाधिकारी जबाबदार असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, पीएससीचे सगळे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना जबाबदार धरायचं.
काहीही झालं की बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम सुरु आहे”. या आरोपावर पंकजा मुंडे यांनी चांगलाच पलटवार केला आहे. म्हणाल्या, ‘बीड जिल्ह्याची मी काळजी करते, तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी होतेय’, अशी सडेतोड टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –


