अमरावती: विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आठ दिवसापासून प्राणंतीक उपोषण करत आहे. रात्री भरपावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या उपोषणाला भेट दिली. आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही इथं माझ्या राजीनामासाठी बसले की न्यायासाठी, हे बरोबर नाही तुमची इच्छा असेल तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो त्यांची काही पर्वा नाही, असं बच्चू कडू म्हणाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात १६ तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून यात या उपोषणावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
“केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव हा उत्तर प्रदेश निवडणुकीत…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
मार्नस लबुशेनने शेअर केले जेवणाचे चित्र; चाहते म्हणाले “तु जेल मध्ये आहेस का?”
“शरद पवारच दादऊचा माणूस आहेत की काय?”, निलेश राणेंचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

