रायगड: महाविकास आघाडी सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्या सारखे असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले होते. याबाबत नाभिक समाजात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येने दानवेच्या विरोधात मोर्चा काढला.
सहा दिवसात दानवे यांनी समाजची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे. यावेळी दानवेच्या फोटोला जोडे मारून त्याच्या पेंढ्याच्या पुतळ्याला आग मोर्चेकरांनी लावून दहन करून निषेध व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
हवामानात मोठा बदल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वातावरण राहणार कोरडे!
“या” दोन अभिनेत्रींनी केला किसिंग सीन; वेब सिरीजची सर्वत्र चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

