🕒 1 min read
सोलापूर : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आह. पीएम किसान पात्र शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवास उपजिल्हाधिकारी आणि योजनेच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे. ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी? पाहूया सविस्तर..
ई-केवायसी प्रक्रिया –
लाभार्थी शेतकऱ्यांना ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे “ई-केवायसी” करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध आहे.
१) लाभार्थी शेतकरी पी. एम. किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये जाऊन “ई-केवायसी” करू शकतात.
२) पी.एम किसान ॲपवर जाऊन ओटीपीद्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण करता येईल.
३) ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने करता यईल. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना या ३ पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा उपयोग करता येईल.
ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति ई-केवायसी प्रक्रिया प्रमाणिकरण दर १५ रूपये चार्ज केंद्र शासनाकडून ठरविलेला आहे. पी. एम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना एप्रिल – जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
