Share

“आधी लगीन रिफायनरीचे नंतर संपर्काचे”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत पत्र लिहिले होते. मात्र याच पत्रानंतर आता कोकणातील राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्नासात घेतले नसल्याची भावना या कार्यकर्त्यांची आहे. त्यात राज्यात सध्या शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवत आहे. पण, राजापूर तालुक्याच्या रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये न जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर शिवसेनेत मोठी नाराजी असून रिफायनरीसाठी चर्चेत असलेल्या गावांमध्ये शिवसेना संपर्क अभियान राबवणार नाही! सध्या फक्त टक्केवारीसाठी रिफायनरीशी संपर्क अभियान राबवले जाणार आहे. आधी लगीन रिफायनरीचे नंतर संपर्काचे.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान राजापूर येथे शिवसंपर्क अभियानच्या नियोजनाबाबत बैठक झाली असून यावेळी रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या गावांबाबत चर्चा झाली. मात्र या ठिकाणी नागरिकांमध्ये रोष आणि त्या ठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

“लाव रे तो व्हिडीओ आणि आता …”, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना जोरदार टोला

“अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत

“…याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही”, अविनाश जाधवांचा हल्लाबोल

“महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!